Fears in our life which creates bridge between your success (in Marathi) - vs INFORMER
Fears in our life which creates bridge between your success (in Marathi)

Fears in our life which creates bridge between your success (in Marathi)

Share This

Hello vs INFORMER readers, if you wants to read this article in other language then you can translate this article in any other language. We provides translator in sidebar.


नवीन व्यवसाय सुरू केल्यावर आपल्याला अनेक प्रश्न पडतात. व्यवसाय चालेल का? उत्पन्न वाढेल का? नफा किती मिळेल? बाजारात आपण टिकून राहू का? पैशाची चणचण भासेल का? असे असंख्य प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतात. मग या प्रश्नांमुळे आपल्याला पराभावाची धास्ती लागते. अर्थात या भितीला काहीच अर्थ नसतो. असं का होते? आज याचा विचार करूयात...

1) _एकाग्रतेचा अभाव_ : सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला जबाबदार असतो. काही लोक आपल्यावर अवलंबून असतात आणि त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवावे लागते. अशा स्थितीत आपले संपूर्ण लक्ष हे कामावर आणि निश्चित केलेल्या ध्येयावर असेल पाहिजे.

जर तुम्ही अशावेळी विचलित झालात आणि शिस्त बाळगली नाही तर आपण निश्चित केलेल्या उद्दिष्टांपासून लांब जावू. याशिवाय आपण भविष्यातही कामावर लक्ष केंद्रीत करणार की नाही, याचीही अनामिक भीती मनात बाळगून असाल तर उद्योगात यश मिळण्याची शक्यता कमी राहते. त्यामुळे स्वतःवर कामावर विश्वास ठेऊन भीती दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा.

2) _जोखमीची भीती_ : आपल्यापैकी बऱ्याच जणांना जोखीम उचलण्याची भलतीच भीती असते. त्यामुळेे ते संपूर्ण आयुष्य चाकोरीबद्ध पद्धतीने जगतात. अशी मंडळी कोणतीही नवीन जबाबदारी उचलण्यास लवकर तयार होत नाहीत. कारण ते सतत अपयशाला भीत असतात. नवीन कोणतीही योजना आखण्याच्या मनःस्थितीत ही मंडळी नसतात. जर आपला स्वभावही असाच असेल तर लक्षात ठेवा. आपण कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत. यश मिळवण्यासाठी आपल्या भीती तर दूर करावी लागेलच. त्याचबरोबर जोखीमही उचलावी लागेल. जोखीम घेतल्याशिवाय कोणताच व्यवसाय सुरू होऊ शकत नाही आणि यशस्वी होऊ शकत नाही.

3) _गमावण्याची भीती_ : उद्योजकाचे यश हे त्याच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असते. कामांचा आराखडा आणि दृष्टीकोन हे व्यवसायाची पायाभरणी करत असतात. याशिवाय उद्योजक पुढे जावू शकत नाही. अशा स्थितीत कल्पनाशक्ती गमावण्याची भीती वाटणे साहजिकच आहे. या भितीला दूर करण्यासाठी आपण स्वतःला नव-नवीन कल्पनांच्या शोधात गुंतवणे गरजेचे आहे.

4) _आर्थिक अडचणीची भीती_ : एका उद्योजकाने व्यवसायात बचत केलेल्या पैशाचीही गुंतवणूक केलेली असते. अशास्थितीत आपल्याला आर्थिक अडचणीची भिती सतत सतावत असते. जर आपला आपल्या कार्यशैलीवर आणि कार्यक्षमतेवर विश्वास असेल तर आपण पैशापेक्षा धोरणाचा पाठलाग करायला हवा. जर अशीच धाडसी वृत्ती मनात बाळगली तर व्यवसायादरम्यान आपल्याला कधीही आर्थिक अडचण येणार नाही.

5) _अपयशाची भीती_ : जगात एकच गोष्ट अशी आहे की, ती आपल्याला यशस्वी होऊ देत नाही आणि ती म्हणजे अपयशाची भीती. अपयश किंवा पराभव हा कोणालाच नको असतो. लक्षात घ्या, जेव्हा आपण अयशस्वी होतो, तेव्हा ते अपयश आपल्याला पचवावे लागते. सर्व उद्योजकांना असा अनुभव येतोच. परंतु अशा काळातही उणिवा दूर करून यशावर मात करून मार्ग काढणारा उद्योजक यशस्वी होतो. त्यामुळे अपयशाच्या भितीकडे लक्ष न देता यशावर लक्ष देणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment