Great political Leader of INDIA (Sharad Pawar) by Darshan Kole. in Marathi - vs INFORMER
Great political Leader of INDIA (Sharad Pawar) by Darshan Kole. in Marathi

Great political Leader of INDIA (Sharad Pawar) by Darshan Kole. in Marathi

Share This
Hello friends this is vs INFORMER today I will tell you story of great Indian political leader Sharad pawar.

If you read this article in English then you go to sidebar of this blog and translate this article into English.

This article was written by Darshan kole.




शरद पवार - राजकारणातील व सहकार क्षेत्रातील एक अष्टपैलु व दैदिप्यमान नेतृत्व. 


 12-12 हा तारीख आठवला तरी सर्व भारतवासीयांच्या डोळ्यासमोर येतो तोप मा.शरद पवार साहेबांचा वाढदिवस.
भारतातील कमीत कमी 80% लोकांना तरी शरद पवार हे नाव या ना त्या कारणांनी स्मरनात असेलच.
अशा अप्रतीम नेतृत्वाच्या वाढदिनानिमीत्त हे  मनातील भाव मांडण्याचा थोडासा प्रामाणीक प्रयत्न.

    शरद पवारांचा जन्म गोविंदराव व शारदाबाई पवार यांच्या घरी 12 डिसेंबर 1940 रोजी झाला. वडील हे शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात कामाला होते तसेच ते शेतकरीही होते. बारामतीपासुन 10 किमी. अंतरावरच काटेवाडी येथे वडीलोपार्जीत शेती.
लहान वयात प्राथमीक शाळेमध्ये हुशार असलेले शरद पवार हे नंतर पुणे विद्यापीठाच्या BMCC कॉलेज मधुन B.Com ची पदवी धारण केली. जरी ते वाणिज्य शाखेतील विद्यार्थी असले तरी त्यांचा कल नेहमी राजकारणाकडेच असे. ते कॉलेज जीवणापासुनच राजकारणात सक्रीय होते. नंतर त्यांचा विवाह प्रतीभा शिंदे यांच्याशी झाला. तेंव्हा पासुन आज पर्यंत त्या सर्व कालखंडात पवार साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे व सावलीसारख्या उभ्या आहेत.
     आज त्यांचाच राजकीय वारसा नेटाने पुढे चालवत आहेत ते मुलगी खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, तसेच साहेबांचे पुतणे व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार. तसेच त्यांचे बंधू प्रतापराव पवार हे सकाळ या दैनीकाचे संस्थापक.
       त्यांच्या खऱ्या राजकीय कारकीर्दिला सुरवात झाली ती सन 1967 साली. 1967 ला सर्वात प्रथम ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडुन गेले तेव्हांपासुन आजपर्यंत ते सलग 50 वर्षे भारताच्या विधीमंडळात न थकता व न थांबता काम करत आहेत. 1967 ला सर्वात तरुण आमदार म्हणुन ते निवडुण आले. नंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यंमत्री बनले, तसेच महाराष्ट्राचे तीन वेळा (1978-1980, 1988-1991, 1993-1995) मुख्यमंत्री होण्याचा बहुमाणही त्यांनी मिळवला.
नंतर त्यांनी 1999 मध्ये स्वतःच्या राजकीय पक्ष राष्ट्रवादीची स्थापना करुण पुढील वाटचाल सुरू ठेवली.
त्याचप्रमाणे केंद्रामध्येही बरेच वर्षे कृषीमंत्री व अन्य खात्याचा कारभार त्यांनी हाताळला. त्यांच्या कालखंडात बरेच महत्वाचे निर्णय घेऊण सामान्य जनतेला व शेतकऱ्याला तारण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला.
         सहकार क्षेत्रावरील त्यांची पकड आज सर्वसृत आहे. त्याचप्रमाणे लहानात लहान कार्यकर्त्याबद्दल असलेली जवळीक व आपुलकी ही त्यांची राजकारणातील सर्वात जमेची बाजु.
कोणाला कधी बळ द्यायचे व कोणाला खाली खेचायचे याची खेळी जणु जन्मताच त्यांच्या अंगी आहे अस वाटतय.
फक्त राजकारणातच नाही तर सर्वच क्षेत्रातील त्यांचे योगदान हे लाख मोलाच आहे. मग ते आंतरराष्ट्रीय व भारतीय क्रिकेट कौंसीलचे अध्यक्षपद असो, स्काऊट-गाईडचे अध्यक्षपद असो वा रयत शिक्षण संस्थेचे चेरमण असो. सर्वच ठीकाणी मोलाचे योगदान त्यांनी दिले व आजही देत आहेत.
        राजकारणातील बारकावे शिकावे तर ते शरद पवारांकडुन असं आज संपुर्ण महाराष्ट्रात बोलल जातय. मध्यंतरी एक जोक सर्व सोशल मिडीया मधुन फीरत होता.
 बंदुक एकाच्या खांद्यावर, निशाना एकावर, गोळी एकाला लागली व जखमी जर वेगळाच झाला असेल तर समजायचं कि शिकारी हे नक्कीच शरद पवार असणार.
हा जरी वरकरणी विनोद वाटत असेल तरी यातुन त्यांच्या राजकारणाची खेळी विस्तृत्वमध्ये समजुन येते.
महाराष्ट्रामध्ये जरी त्यांचा पक्ष सत्तेत नसेल तरी पवारांशिवाय राजकारणातील एक पानही हालत नाही हे बोललं जातय. याचं महत्वाचं कारण म्हणजे जनमानसामध्ये असलेली त्यांची प्रतीमा, सहकार क्षेत्रावरील त्यांची भक्कम पकड, अफाट बुध्दीमत्ता, सर्व स्तरांवरील मोलाचं योगदान, राजकारणाच्या पलीकडील मैत्री, व न थकता काम करत राहण्याची त्यांची सवय. व
आजही त्यांचे योगदान हे लाभतच आहे.

        राजकारणापासुन ते समाजकारणापर्यंतच्या GOD FATHER चा 12-12 हा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमीत्त त्यांच्या भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा।।। त्यांचे उर्वरीत आयुष्य हे सुख-समृध्दीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.


टिप - सदर लेख हा राजकीय विचारातुन लिहीलेला नसुन तो एक व्यक्ती विषेश म्हणुन प्रसिध्द केलेला आहे.


                                     
                

No comments:

Post a Comment