Hello friends this is vs INFORMER and today i will telling you amazing records of Rohit Sharma in Marathi.
If you wants to read this information in any other language then you simply go to sidebar. We provides translator facility for visitors. You can easily translates this page in any other language.
नियमित कर्णधार विराटच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माने लंकेविरुद्ध मोहालीत शानदार द्विशतक ठोकले. रोहितचे कारकिर्दीतील हे तिसरे द्विशतक आहे. तीन वेळा द्विशतक करणारा रोहित जगामधील एकमेव खेळाडू बनला आहे. यासोबतच रोहितने अनेक विक्रम आपल्या नावे केले. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
रोहितची तीन दुहेरी शतकं :
1) रोहित शर्माने आपले पहिले द्विशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 नोव्हेंबर 2013 ला ठोकले होते. बंगळूरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या सामन्यात रोहितने 108 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार आणि 16 षटकारांसह 209 धावांची खेळी केली होती.
2) कोलकाताच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्सच्या मैदानावर 13 नोव्हेंबर 2014 ला पुन्हा एकदा हिटमॅन रोहितचे वादळ घोंगावले होते. लंकेविरुद्धच्या या सामन्यात रोहितने 125 चेंडूंचा सामना करताना 33 चौकार आणि 9 षटकारांसह 264 धावांची तुफानी खेळी केली होती.
3) आज मोहालीमध्ये रोहितने एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे आणि लंकेविरुद्ध दुसरे द्विशतक झळकावले. या सामन्यात रोहितने 153 चेंडूचा सामना करताना 13 चौकार आणि 12 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 208 धावा.
द्विशतक करणारा केवळ दुसरा कर्णधार
रोहित पहिल्या वनडेत 2 धावांवर बाद झाला होता. त्या पराभवाची परतफेड आज रोहितने दुसऱ्या वनडेत केली आहे. यापूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये वनडेत कर्णधार म्हणून द्विशतक करणाऱ्याचा पहिला मान भारतीय संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागला मिळतो. त्याने इंदोर येथे झालेल्या वनडेत विंडीजविरुद्ध 219 धावांची खेळी केली होती.
वनडेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू :
i) 219 वीरेंद्र सेहवाग (विरुद्ध विंडीज)
ii) 208* रोहित शर्मा (विरुद्ध श्रीलंका)
iii) 189 सनथ जयसूर्या (विरुद्ध भारत)
iv) 186* सचिन तेंडुलकर (विरुद्ध न्यूझीलँड)
'वन डे'मध्ये द्विशतक ठोकणारे दिग्गज :
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 7 द्विशतके केली गेली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारे जगात फक्त पाच खेळाडू आहेत आणि अभिमानाची बाब म्हणजे यात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारताच्या रोहित शर्माने तीन वेळा द्विशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. चला तर पाहूया कोणत्या खेळाडूने कधी द्विशतक झळकावले आहे.
1) सचिन तेंडुलकर (भारत) : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध - नाबाद 200
2) विरेंद्र सेहवाग (भारत) : वेस्ट इंडिजविरुद्ध - 219 धावा
3) रोहित शर्मा (भारत) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध - 209 धावा I श्रीलंकेविरुद्ध - 264 धावा I श्रीलंकेविरुद्ध - नाबाद 208 धावा
4) ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) : झिम्बाब्वेविरुद्ध - 215 धावा
5) मार्टिन गुप्टील (न्यूझीलंड ) : वेस्ट इंडिजविरुद्ध - नाबाद 237 धावा
No comments:
Post a Comment